भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त (Diabetes)ने त्रस्त आहेत. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यावर उपचार शोधणं देखील अत्यावश्यक बनलं आहे. मागच्या 4 वर्षांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. तणाव, जास्त वजन वाढणं आणि खराब जीवनशैली ही मधुमेह वाढण्यामागची कारणे आहेत. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. काही औषधी वनस्पती आहेत, ज्या मधुमेही रुग्णासाठी फायदेशीर आहेत. चला तर मग आज आपण याच वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत…
कारलं
मधुमेहविरोधी गुणधर्मांसाठी कारलं बऱ्याच वर्षांपासून वापरलं जातं. कारल्यात पॉलीपेप्टाइड-पी नावाचं इन्सुलिनसारखं संयुग असतं, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतं.यामुळे कारलं मधुमेह व्यवस्थापनासाठी एक उत्कृष्ट पर्याय बनते.
जांभूळ
जांभूळ, ज्याला इंडियन ब्लॅकबेरी किंवा ब्लॅक प्लम असंही म्हणतात, त्यात हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. जांभूळ किंवा त्याचा रस सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते, इन्सुलिन सुधारते. जाभूळातील सत्व साखरेचं शोषण कमी करतात. जांभूळ मधुमेही रुग्णांमध्ये जखम भरण्याच्या प्रक्रियेला गती देते.
गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया)
गुळवेल किंवा गिलॉय, ज्याला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया देखील म्हणतात, हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाची पातळी आणि मधुमेहाची इतर लक्षणं नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीची पानं बरीच प्रभावी ठरतात. ही औषधी वनस्पती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.
आवळा
आवळा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते आणि साखर वाढू देत नाही. आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जो स्वादुपिंडाचं कार्य सुधारण्यास आणि इंसुलिन स्राव वाढवण्यास मदत करतो.