Disha Vakani

Disha Vakani : तब्बल 5 वर्षांनंतर चाहत्यांसमोर आली दया बेन! ओळखणेदेखील झाले कठीण

1081 0

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून ही मालिका सतत या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांत या मालिकेतील कलाकारांनी मालिका सोडली आहे. नुसती मालिका सोडलेली नाही तर मालिकेवर काही आरोप लावले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या मालिकेतून लाडक्या दयाने प्रेक्षकांच्या निरोप घेतला. ‘दयाबेन’ म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani) हिने 5 वर्षांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर आता जवळजवळ 5 वर्षानंतर जुनी दयाबेन समोर आली आहे.

दिशा वकाणी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘दयाबेन’ ही व्यक्तिरेखा साकारून वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिशा वाकाणी (Disha Vakani) हिने शो सोडल्याला 5 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही चाहत्यांच्या मनात दया जीवंत आहे. 2017 मध्ये दिशा वाकानीने प्रसूतीसाठी रजा घेतली आणि त्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परतली नाही. मालिकेचा निरोप घेतल्यापासून ही अभिनेत्री लाइमलाइटपासून देखील गायब आहे.

अभिनेत्रीचे चाहते तिला पाहण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होते, पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. दिशा वाकाणीची अलीकडेच एक झलक पाहायला मिळाली.नुकतीच ‘दयाबेन’ उर्फ ​​अभिनेत्री दिशा वाकानी तिच्या एका चाहत्याला भेटली होती. या जोडप्याने अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीचा ब्लॉग बनवला असून तो यूट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूर्णपणे वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!