Sabudana

Sabudana : साबुदाणा खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

515 0

साबुदाणा (Sabudana) हा भारतीयांमध्ये एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खाद्यपदार्थ आहे. विशेषत: भारतामध्ये उपवासाच्या वेळी हा पदार्थ खाल्ला जातो. तर आज आपण जाणून घेऊया साबुदाणा खाणं खरच फायदेशीर आहे का?

साबुदाणा खायला सगळ्यांना आवडतो. साबुदाणा हा अत्यंत शुद्ध केलेल्या स्टार्चचा एक प्रकार आहे, जो कसावा किंवा साबुदाणा वनस्पतीच्या मुळांपासून मिळतो. ते इतके शुद्ध केलं जातं की, ते रक्तामध्ये फार लवकर शोषलं जातं आणि रक्तातील साखर वेगाने वाढतं. हे एक अतिशय उच्च ग्लायसेमिक अन्न आहे, म्हणजेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) इंडेक्स खूप जास्त आहे.

साबुदाणा खाण्याचे तोटे
साबुदाण्याचे दररोज सेवन केले तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं. साबुदाणा रक्तात लगेच शोषला जातो, त्यामुळे साबुदाणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असते. साबुदाण्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.

‘या’ लोकांनी साबुदाणा खाणं टाळावं
मधुमेह आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यासारख्या इतर चयापचयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी असे पदार्थ टाळावेत.

Share This News
error: Content is protected !!