Babar Azam

Babar Azam: श्रीलंकाविरुद्ध सामन्यात बाबर आझमने खेळला ‘तो’ ‘युनिक शॉट’ सोशल मीडियावर व्हायरल

684 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामना जिंकून पाकिस्तानच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, कोलंबोमध्ये या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ त्यांच्या पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतला. तर, पाकिस्तानचा संघ चांगल्या स्थितीत असून कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि अब्दुल्ला शफीक खिंड लढवत आहेत. या सामन्यादरम्यान बाबर आझमने खेळलेल्या एका युनिक शॉटची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या डावातील 37 व्या षटकात असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर बाबर आझमने आगळा वेगळा शॉट खेळला. या शॉटवर बाबरला (Babar Azam) 4 धावा मिळाल्या. फर्नांडोने फुल लेन्थ चेंडू टाकला, जो ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बाबरने हा चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. पण अखेरच्या क्षणी या चेंडूवर आगळा-वेगळा शॉट मारला. यानंतर चेंडू फर्स्ट स्लीप आणि गलीमधून सीमारेषेला जाऊन आदळला.

या सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत बाबर आझमने (Babar Azam) 49 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात बाबर आझमला काही खास कामगिरी करता आली नव्हती.

Share This News
error: Content is protected !!