Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar :छ. संभाजीनगरात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 जण गंभीर जखमी

632 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड परिसरात काल रात्री बाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रक महामार्गावर पलटी झाला, सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही.

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

मध्यरात्रीच्या सुमारास अपघात
धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड परिसरात काल रात्री बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकच्या अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या 5 जणांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा झाला अपघात?
कार आणि ट्रक ही दोन्ही वाहने बीडवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाली होती. पाचोड परिसरात ट्रकनं कारला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील कारला धडक देताच ट्रक पलटी झाला. ट्रक रोडवर पलटी झाल्यानं मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती, मात्र सुदैवानं काहीही घडलं नाही. या अपघातात दोन्ही वाहनाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

Share This News
error: Content is protected !!