Chatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

923 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात (Chhatrapati Sambhajinagar) जालना रोड सुंदरवाडी या ठिकाणी सोमवार दि. 24 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तिन्ही मित्रांच्या नातेवाईकांनी तातडीने घाटी रुग्णालयात धाव घेतली.

काय घडले नेमके?
विजय जगन्नाथ काकडे (वय 25 वर्ष, रा. विष्णुनगर) अभिषेक राजू लोकल (वय 25 वर्ष, रा. कडा वसाहत गारखेडा परिसर) असे मयत झालेल्या दोन मित्रांची नावं आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय, अभिषेक दोघेही कंपनीत कामाला होते. तर उमेश हा दुकानात कामाला होता. विजय, अभिषेक, उमेश हे तिघे एकमेकांचे बालमित्र होते.

धक्कादायक ! पत्नी आणि पुतण्याचा खून करून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

रविवारी अभिषेक हा कंपनीत काम करून आला. त्यानंतर विजय, अभिषेक, उमेश हे तिघे दुचाकी एम एच.20 सी एन 0447 जालना रोडवर सुंदरवाडी या ठिकाणी जेवण करण्यासाठी गेले. जेवण करून झाल्यानंतर दुचाकीवर भरधाव वेगात झाल्टा फाटा येथून विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात बोलेरो गाडीला त्यांच्या बाईकने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या अपघाताची (Chhatrapati Sambhajinagar) माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र, गौतम पातारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी विजय आणि अभिषेक याला मृत घोषित केले तर उमेशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी तातडीने घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!