Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

505 0

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai – Pune Highway) आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे पुण्याकडून मुंबईला (Mumbai – Pune Highway) जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात ठिकठिकाणी या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. यामुळे याच दरडी हटविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे मुंबई महामार्गावर रविवारी दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरतीच या दरडी कोसळल्या होत्या. याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालेला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक मंद गतीने सुरू होती. लोणावळ्याजवळ एक दरड कोसळली आहे तर दुसरी अडोशी बोगद्याजवळ कोसळली होती. या ठिकाणची दरड हटविण्यात आलेली आहे. मात्र महामार्गावरील एक लेन अद्याप बंद ठेवण्यात आली आहे.

यादरम्यान पर्याय म्हणून पुण्याहून मुंबईकडे (Mumbai – Pune Highway) येताना चिवळे पॉइंट लागतो तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल. याच मार्गावरुन चार चाकी, हलकी मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. 12 ते 2 यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!