Breaking News

वरंध घाट बंदचे आदेश झुगारणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी प्रशासनाची अशीही युक्ती

871 0

पुणे- पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा जवळचा मार्ग आहे. त्याशिवाय वर्ष विहार करण्यासाठी या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा आदेश झुगारून अनेक वाहनचालक या घाटातून प्रवास करत असल्यामुळे प्रशासनाला अखेर वेगळीच युक्ती करावी लागली.

हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह वरंधा घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. या घाटात.पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी होऊन दरडी कोसळण्याचे.प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. २२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मात्र प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता अनेक वाहनचालक या घाटातून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर अनेक ठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Share This News
error: Content is protected !!