छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आपली आणि कुटुंबाची बदनामी होत असल्याच्या कारणातून एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट (Crime News) केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
Manipur Crime : मणिपूर घटनेमधील मुख्य आरोपीच्या घराला अज्ञाताने लावली आग
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता. या बॅनरवर महेशने पाय ठेवला आणि हीच चूक त्याच्या अंगलट आली. त्याने याबद्दल माफीदेखील मागितली. मात्र त्याचं काहीही न ऐकता तिथल्या 10 ते 12 तरुणींना बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या घरच्यांनाही मारहाण केली आहे.
Pune Koyta Gang : “कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे” म्हणणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी काढली धिंड
ही संपूर्ण धक्कादायक घटना (Crime News) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या ईसारवाडी या ठिकाणी घडली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी महेश आणि कुटुंबातील सदस्यांना माफी मागण्यास भाग पाडले. तसेच हा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. मृत तरुणाचे नाव महेश बोबडे असे आहे. त्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे शेतात गळफास लावुन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 08 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.