Weather Forecast

Weather Forecast : मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

812 0

पुणे : रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather Forecast) या जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडसह राज्याची राजधानी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांदेखील हवामान विभागाकडून (Weather Forecast) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

NDRF मध्ये भरती कसे होतात? ते कसे काम करतात?

हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. रायगडसाठी 20 आणि 21 जुलै हे दोन दिवस धोक्याचा इशारा आहे. ठाणे व पालघर जिल्हालाही 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट असणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर सातारा जिल्ह्याला ऑरेंज आणि कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना देण्यात आला अलर्ट

प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन
हवामान विभागाकडून (Weather Forecast) कोकणासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ तातडीचं महत्त्वाचं काम असेल तरंच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये, असेही आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!