Amrawati News

Amravati News : झाडाचा आश्रय घेणे पडले महागात; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू

1173 0

अमरावती : सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यादरम्यान अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील मेळघाटात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेले व्यक्ती नात्याने एकमेकांचे काका – पुतणे होते. चिखलदरा तालुक्यातील मोरगड या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

काय घडले नेमके?
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मोरगड या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत होते. यावेळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरु झाला. यामुळे पावसात काम करणं थांबवून शेतकरी आणि शेतमजूर बाजूलाच असलेल्या लिंबाच्या झाडाच्या आश्रयासाठी थांबले. मात्र यावेळी दुर्दैवाने झाडावर वीज पडून यामध्ये काका आणि पुतण्या अशा दोघांचा मृत्यू झाला. सुनिल मोती भास्कर (वय 32) असे काकाचे तर निलेश बजरंग भास्कर (वय 20) असं मृत पुतण्याचे नाव आहे.

Crime Video : ताजमहाल बघायला गेलेल्या पर्यटकाला मारहाण; Video आला समोर

8 जण जखमी
शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतातील मजूर शेतातच असलेल्या लिंबाच्या झाडाचा आश्रय घेण्याकरीता गेले असता काका- पुतण्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ललीता राजाराम जाम्बेकर (45) आरती सोमेश जम्बेकर (20) पार्वती राजाराम भारकर (45) जानकी किशोर कास्टेकर (24) सविता चान्डेकर (28) होमपती मेटकर (55) बजरंग भास्कर (55) मिना बजरंग भास्कर (45) यांचा समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!