Sad News

Thane News : नाल्यात पडलेले ‘ते’ बाळ सापडलेच नाही; जुना Video व्हायरल

11838 0

ठाणे : काल दुपारच्या सुमारास अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक मन हेलावून टाकणारी घटना (Thane News) घडली होती. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात (Thane News) होते. एका व्यक्तीच्या हातातून चार महिन्यांचं बाळ वाहत्या नाल्यात पडले. यानंतर नाल्याच्या वाहत्या पाण्यात हे बाळ वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईने एकच आक्रोश केला. ते बाळ आता जिवंत सापडले असल्याचे चर्चा यावेळी रंगू लागल्या.

काय घडले होते नेमके?
दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान 2 तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. यादरम्यान एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ सुटले आणि पाण्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत ते बाळ वाहून गेले होते.

यादरम्यान ते बाळ जिवंत सापडल्याच्या बातम्या समोर आल्या. याबाबत निवासी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सापडलेले बाळ हे रासायनी मधील बाळ होते आणि ती जुनी माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!