Raigad News

Raigad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

534 0

रायगड : आजची सकाळ ही रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावासाठी काळरात्र ठरली. या ठिकाणी (Raigad News) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दरड कोसळली आणि संपूर्ण गाव त्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 मृतदेह हाती लागले आहेत, तर 60 जण अजूनही बेपत्ता असल्याचे समजत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या घटनेचा आढावा घेतला.

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एक कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी तिथल्या महिलेनं सांगितलं 6 जण अडकले आहेत. कसं शोधायचं, काहीच समजत नाही. तिथल्या तरुणानंही सांगितलं आमचे 6 जण आहेत कुठे शोधायचं, त्यावर मुख्यमंत्र्यांनी धीर देत काळजी करु नका तुमच्यासोबत एक माणूस पाठवतो असं सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाचं सांत्वन करत धीर दिला आहे.

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

रायगडमध्ये (Raigad News) गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्यादरम्यान इर्शाळवाडी इथे दरड कोसळली. आधी पावसामुळे त्या ठिकाणची लाईट गेली आणि मग रात्रीच्या अंधारात दरड कोसळली आणि अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. काही क्षणात संपूर्ण गाव उध्वस्त झाले. या ठिकाणी सध्या NDRFच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide