माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

884 0

रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहेयेथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहेयामध्ये 120 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त केली जात आहेमध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेहबाहेर काढण्यात आले आहेततसंच एकूण 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून  किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहेयेथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेतया घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये सुमारे 90 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून अधिक जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

शिवदुर्गनिसर्ग मित्रवेध सह्याद्री या टीम्सपोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत.या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!