Crime Video

Crime Video : ताजमहाल बघायला गेलेल्या पर्यटकाला मारहाण; Video आला समोर

3564 0

आग्रा : आग्र्यात ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला बेदम मारहाण (Crime Video) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण मारहाणीची (Crime Video) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या मारहाणीप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. गाडीला टच झाल्यामुळे गुंडांनी पर्यटकाला काठीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे तर बाकी आरोपींचा शोध सुरु आहे.

काय घडले नेमके?
ताजगंजच्या बसई चौकी क्षेत्रात ही मारहाणीची घटना घडली आहे. दिल्लीत राहणारा एक पर्यटक आग्र्यात ताज महाल पाहण्यासाठी आला. त्यावेळी त्याची गाडी परिक्रमा करण्यासाठी आलेल्यांना धडकली. यामुळे संतप्त झालेल्या 15 ते 16 जणांच्या गटाने काठीने त्या पर्यटकावर हल्ला केला. यावेळी हल्ल्यातून वाचण्यासाठी पर्यटक जवळच्याच एका दुकानात शिरला. त्या ठिकाणीदेखील गुंडानी दुकानात घुसून त्या पर्यटकाला मारहाण (Crime Video) केली आहे. ही संपूर्ण मारहाणीची घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता चार ते पाच जण पर्यटकाला घेरून काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींची ओळख पटवून 5 जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!