Paithan News

Paithan News : पाणी शेंदताना विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

624 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण (Paithan News) तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पैठण (Paithan News) तालुक्यातील मुरमा येथील 35 वर्षीय विवाहीत महिलेचा विहिरीवरचे पाणी शेंदताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छाया भरत मापारी,असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
भरत मापारी व त्यांची पत्नी छाया मापारी हे सोमवारी सकाळी घरुन जेवण करून घरगुती कामे आटोपून स्वतः शेतात शेतपिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी छाया विहिरीतून पाणी शेंदत होत्या. यादरम्यान छाया ह्यांचा तोल जाऊन त्या विहीरीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!