Buldhana News

Buldhana News : मित्राची बाईक पळवली अन् घात झाला; तरुणाचा जागीच मृत्यू

846 0

बुलढाणा : आपल्याकडे एक म्हण आहे करावे तसे भरावे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा प्रत्यय आज बुलढाण्यामध्ये (Buldhana News) आला आहे. त्याचे घडले असे कि, मित्राची बाईक चोरून नेणाऱ्या मित्राला आपल्या कर्माचे फळ भेटले आहे. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
या प्रकरणात मित्राची गाडी चोरुन घेऊन पळून जाणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. दुचाकी चोरुन नेत असताना दुचाकीस्वाराने बसला धडक दिली आणि त्याचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती कि, यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

अनिल राठोड असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेरू माटरगाव येथून मित्र शुभम थोरात यांच्या मोटरसायकलवर अकोट येथील अनिल राठोड आला होता. शुभम देखील अनिलचा पाठलाग करू लागला. पकडले जाण्याच्या भीतीनं अनिलने स्पीड वाढवला आणि तो पसार झाला. यादरम्यान बाईकची धडक समोर उभ्या असलेला बसली यामध्ये अनिलचा जागीच मृत्यू झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!