heavy Rain

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना देण्यात आला अलर्ट

788 0

मुंबई : पावसाने आता ठिकठिकाणी जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

उत्तर रायगड मुंबई आणि उपनगरं, आजूबाजूच्या काही भागांवर ढग तीव्र असून यामुळे पुढच्या 2-3 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस होईल तर गोव्यातही पुढच्या काही तासांमध्ये तुफान पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!