Breaking News

राज ठाकरे आजपासून पुण्यात ; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार राज ठाकरे ?

647 0

महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु सुरु केली आहे.राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीत अधिक लक्ष घातलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा एकदा चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतील.7 मार्च ते 10 मार्च या दरम्यान राज ठाकरे पुण्यात असतील.राज ठाकरे या दौऱ्यात मनसेचे कार्यक्रम, मनसेचा वर्धापन दिन, पिंपरी चिंचवड दौरा या कार्यक्रमांना उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. यावर्षी पहिल्यांदा पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे.

असा असेल राज ठाकरे यांचा पुणे दौरा

* राज ठाकरे 7 ते 10 तारखेपर्यंत पुण्याचा दौरा करणार आहेत.
* 8 तारखेला राज ठाकरे पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
* मनसेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. पुण्यात वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करतील.
* 10 मार्चला राज ठाकरे पिंपरी चिंचवडचा दौरा करणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस पुण्यात तळ ठोकणार असून त्यांचं पुणे महापालिका निवडणूक हे लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे

Share This News
error: Content is protected !!