Hairfall

Hairfall Remedies: पावसाळ्यात खुप केस गळतात? मग ‘हे’ उपाय ट्राय करा केस गळतीपासून होईल सुटका

1340 0

पावसाळ्यात केस गळण्याची (Hairfall Remedies) समस्या अनेकांना भेडसावत असते. कारण हवेतील आर्द्रता टाळूला तेलकट बनवते, त्यामुळे केस चिकट होतात, त्यामुळे त्यात घाण साचते आणि केस गळू (Hairfall Remedies) लागतात. केसांमधला चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून अनेकदा केस धुता, त्यामुळे केसांचा ओलावा निघून जातो आणि केस निर्जीव होऊन गळू लागतात. तसेच प्रदूषण, बाहेरचं खाणं आणि जास्त तणाव यामुळे देखील तुमचे केस गळायला सुरुवात होते. तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल तर आम्ही तुम्हाला आज असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्यामुळे तुमचे केस गळणे कमी होण्यास मदत होईल.

Weight Loss : चहा प्यायल्यानं कमी होऊ शकतं वजन; काय म्हणतात तज्ञ?

1) केसगळतीसाठी तुम्ही कडुलिंबाची पानं वापरू शकता. कारण ती केसांची मुळं मजबूत करण्यास आणि केस गळणं कमी करण्यास मदत करतात.

2) केसांचं गळणं थांबवण्यासाठी तुम्ही पालक वापरू शकता. त्यात व्हिटॅमिन बी, सी, ई, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि लोह आढळते. लोह टाळूला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते आणि केस मजबूत करते.

तुम्ही रील्स पाहण्यासाठी बराच वेळ घालवता का? मग आताच व्हा सावध; नाहीतर होईल ‘हा’ आजार

3) खोबरेल तेल देखील केस गळणं थांबवू शकतं, कारण त्यात लॉरिक ऍसिडचे अस्तित्व आढळते. हे केसांच्या मुळांचे पोषण करते आणि त्यांना तुटण्यापासून वाचवते.

4) केस तुटणे आणि केस गळणं (Hairfall Remedies) थांबवण्यासाठी मेथीचे दाणेदेखील उपयुक्त ठरू शकते. यामध्ये निकोटिनिक ऍसिड आणि प्रोटीन आढळतात, ज्यामुळे केस गळणे थांबवण्यास मदत होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!