Shahid Afridi

Shahid Afridi : वर्ल्ड कपआधी आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला…

1750 0

इस्लामाबाद : यंदाचा आय़सीसी वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान खेळेल का नाही याबद्दल अजून पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, मात्र भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पाकिस्तानने आम्ही आय़सीसी वर्ल्ड कप खेळणार नाही अशी धमकी दिली. यंदाचा आशिया कप हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. यादरम्यान आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात पाकिस्तानचा विजय झाल्यास तिथले लोक दगड मारतात असा आरोप शाहिद आफ्रिदीकडून करण्यात आला आहे.

भारताने आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यानतंर पाकिस्तानने भारतात वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू असं म्हटलं होतं. आयसीसीकडे भारताबाहेर सामने खेळवण्याची मागणी त्यांनी केली. मात्र ती मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. स्पर्धेचं शेड्युल जारी करण्यात आले असून आता पीसीबीला सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी ?
भारतात पाकिस्तानने जाऊन खेळलं पाहिजे. आमच्यासाठीही तो खूप दबावाचा क्षण होता जेव्हा आम्ही चौकार षटकार मारायचो तेव्हा भारतात आमच्यासाठी कुणी टाळ्या वाजवायचं नाही. एकदा तर असंही झालं होतं की, बंगळुरू कसोटीत आम्ही जिंकलो तेव्हा हॉटेलला जाताना गाडीवर दगडफेक झाली होती.काही लोक म्हणत आहेत भारतात जाऊन पाकिस्तानने वर्ल्ड कप खेळू नये. स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा. मी याच्या विरोधात आहे. पाकिस्तानने तिथे जाऊन वर्ल्ड कपमध्ये खेळावं आणि जिंकून परत यावं असे आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला आहे.

Share This News
error: Content is protected !!