पुणे : पुण्यातील (Pune News) जुन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) रात्रीच्या वेळी घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुन्नरमधील साबळेवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मारुती भाऊ साबळे (वय 83) व पुताबाई मारुती साबळे (वय 73) असे पती-पत्नीचं नाव आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Burning Car : मुंबई-बंगळुरू महामार्गवर बर्निंग कारचा थरार; Video आला समोर
काय घडले नेमके?
जुन्नर तालुक्यातील (Pune News) आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील आदर्श पुरस्कार विजेते माजी सरपंच मारुती साबळे व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे यांच्या घराला रात्रीच्यावेळी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती कि त्यातून वेळीच बाहेर पडता न आल्याने घरातच गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Acid Attack : लग्न मोडल्यामुळे संतप्त होऊन आरोपीचे झोपलेल्या तरुणीसोबत ‘हे’ संतापजनक कृत्य
साबळेवाडी या छोट्या वस्तीमध्ये मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला आणि ते झोपी गेले. रात्री दिव्याने अचानक पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला.यानंतर ही आग संपूर्ण घरात पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्याने त्यांना ते शक्य झाले नाही आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.