Sanjay Kakde

Sanjay Kakde : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ; शेअर इक्विटी बुडविल्याप्रकरणी 5 गाड्या जप्त तर कंपनीचे समभाग विक्रीचे कोर्टाकडून आदेश

665 0

पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने 786 करोड रुपयांच्या शेअर्स बुडविल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतरांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने काकडे यांच्या कंपनीच्या समभागासह त्यांच्या जप्त केलेल्या पाच गाड्यांची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितले यांनी हे आदेश दिले आहेत.

Ajit Pawar : अर्थमंत्रालयाचा पदभार मिळताच अजित पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन

विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुडवले
विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने 786 करोड रुपयांच्या शेअर्स बुडविल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतरांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीत काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले होते.याबाबत कोर्टाने शेड्युल पण दिले होते. याप्रकरणी कंपनीच्यावतीने उच्च न्यायालयात नव्याने शेअर्सच्या विक्रीसाठी बोली लावण्यासाठी, तसेच जप्त केलेल्या वाहनांच्या विक्री करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती.

Suicide News : आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

5 गाड्यांच्या विक्रीचे आदेश
या प्रकरणावर 12 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या विनंतीची दखल घेत काकडे यांच्या 5 गाड्यांच्या विक्रीचे आदेश दिले आहेत.तसेच लिलावाच्या अटी व शर्ती इंटरनेट डोमेन वर उपलब्ध करुन देण्याच्या निर्देशासह बोलीदारांना कागदपत्रे इत्यादी तपासणीसाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचे कोर्टाच्या आदेशात म्हंटले आहे. याचबरोबर मुंबई व पुणे सहित इतर शहरांमध्ये नव्याने लिलावासाठी प्रस्तावित वेळापत्रकाची सुचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणामुळे संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!