Beer

Beer : चहा-कॉफीसारखं काही मिनिटांत घरच्या घरीच बनवा बिअर

508 0

जर्मनी : ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही कॉफी प्यायली असेल. या ठिकाणी तुम्हाला पावडर कॉफी प्यायला मिळते जी दूध किंवा पाण्यात मिसळल्यानंतर लगेच पिता शकते. त्याचप्रमाणे आता बाजारात बिअर (Beer) पावडरदेखील आली आहे. ज्यामुळे तुम्ही मिनिटांत बिअर बनवू शकता. जसं तुम्ही इन्स्टंट कॉफी बनवता किंवा प्रोटीन शेक बनवतो त्याच पद्धतीने ही बिअऱ (Beer) बनवयची आहे. या बिअरची चव अगदी सामान्य बिअरसारखीच असते.

जर्मनीतील Neuzeller Klosterbräu कंपनीने ही इन्स्टंट बिअर (Beer) पावडर तयार केली आहे. ही कंपनी या उद्योगातील 500 वर्षे जुनी कंपनी आहे. ही पावडर कमी संसाधनं वापरते, त्यांचा वाहतूक खर्चही खूप कमी आहे, ही बनवायला अगदी सोपी आहे, याचा पर्यावरणावरही खूप परिणाम होतो, असं कंपनीने सांगितलं आहे.

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांना माहित आहे की लोकांना अशी बिअर पिणं सुरुवातीला आवडणार नाही. मात्र त्यांची ही बिअर हा व्यवसाय पूर्णपणे बदलण्याचं काम करत आहे. हे बाजारात नवीन उत्पादन नाही, परंतु बाजारपेठ बदलण्याचे काम करत आहे. ज्या कंपनीने ही बिअर तयार केली कंपनी लवकरच त्याचे अल्कोहोलिक व्हर्जन देखील बनवणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!