Rahul Narvekar

Maharashtra Politics : न्यायालयाच्या नोटीसवर राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

1084 0

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर आज सुनावणी झाली. यादरम्यान विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस पाठवली. या नोटिसीत दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

नोटिसीवर नार्वेकरांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टाच्या नोटीसबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नोटीस मिळाली आहे अभ्यास करून उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide