Ritu Karidhal

Ritu Karidhal : चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या रितू कारिधाल कोण आहेत?

804 0

मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज महत्वकांक्षी चांद्रयान 3 लाँच केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरुन चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेने झेपावले आहे. या मिशनचं नेतृत्व चक्क एका महिलेने केले आहे. त्यांचे नाव आहे रितू कारिधाल (Ritu Karidhal). चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

कोण आहेत रितू कारिधाल ?
रितू यांनी शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेजमधून घेतलं आणि नंतर लखनऊ विद्यापीठातून फिजिक्समध्ये पदवी घेतली. सहा महिने संशोधन केलं, व त्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली. विज्ञान आणि अवकाश संशोधनाची आवड असल्याने रितू यांनी बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर 1997 मध्ये त्यांनी इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. एरोस्पेसमध्ये पारंगत असलेल्या रितू यांचं करिअर यशांनी भरलेले आहे. त्यांना 2007 मध्ये यंग साइंटिस्ट अवॉर्डही मिळाला आहे. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे देशातील आघाडीच्या अवकाश शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांना ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओखळले जाते. रितू यांच्या या आधीच्या मिशनमधील भूमिका लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. रितू या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या.

रितू यांनी मिशन मंगलयान आणि मिशन चांद्रयान-2 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना लहानपणापासूनच अंतराळ आणि अवकाशशास्त्रात रस होता. रितू यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी त्यांच्या कामगिरीइतकीच मोठी आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यंग साइंटिस्ट अवॉर्ड, मार्स आर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड असे विविध अवॉर्ड त्यांना मिळालेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!