Supreme Court : 2 आठवड्यात उत्तर द्या; कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.
Maharashtra Politics : दिल्ली पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही; रोहित पवारांची टीका
यादरम्यान विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस पाठवली. या नोटिसीत दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.
