Urfi Javed : उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? ‘या’ चित्रपटात दिसू शकते
मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. आपल्या अतरंगी फॅशनमुळे ती मोठ्या कधी उर्फीचा (Urfi Javed) फॅशन सेन्स लोकांना आवडतो, तर कधी ती ट्रोलच्या निशाण्यावर येते. सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त शैलीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण ती आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात सापडते. यादरम्यान आता उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार अशी चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच एकता कपूरनं तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. ‘एलएसडी 2’ असं या चित्रपटाचं नाव होतं. आता उर्फीच्या (Urfi Javed) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तिला एलएसडी 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reel/CuoR_W_s6Sc/?utm_source=ig_embed&ig_rid=6279d09d-0f73-4834-ba83-8e100c91d1bf
उर्फीसोबत (Urfi Javed) या चित्रपटात ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया देखील दिसणार आहेत. एकता टास्क घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली तेव्हा शोदरम्यानच निमृतला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. एकता कपूरचा ‘एलएसडी’ 2 हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘एलएसडी’चा सिक्वेल आहे.
