Rohit Pawar

Maharashtra Politics : दिल्ली पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही; रोहित पवारांची टीका

880 0

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाले आणि महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) एका वेगळ्या वळणावर गेले. आता तिन्ही गटात खातेवाटपावरुन मोठा तिढा पाहायला मिळत आहे. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काही नेत्यांनी दिल्लीवारी (Maharashtra Politics) सुरु केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्र्यांचे खातेवाटप यावर सध्या बरीच घमासान पाहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडीवर (Maharashtra Politics) बोलताना रोहित पवार म्हणाले महाराष्ट्र आणि सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नाही. पण दिल्लीच्या वाऱ्या पाहिल्या तर कुठेतरी दुःख वाटतं. शिवसेना आणि भाजपामधील अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांच्याही पदरात काही पडले नाही. वर्षभरात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिंदे गटाला आता एक भाकर मिळणार होती. त्यात आता अर्धी भाकर मिळणार आहे. अर्ध्याचा तुकडा कधी होईल हे त्यांनाही समजणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!