Solapur Crime

Solapur Crime : दुसऱ्यांसाठी मदत करायला गेला आणि नियतीने तरुणाचा घात केला; काय घडले नेमके?

7815 0

सोलापूर : सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Solapur Crime) झाला आहे. मृत तरुणाचे अवघे 6 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आपल्या तरुण मुलाच्या निधनामुळे आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोंबकळत असलेली विद्युत वाहिनी जोडत असताना शॉक बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल अभिमान सातपुते (वय 26 रा. नान्नज ता. उत्तर सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Ajit Pawar : “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कायम हुजरेच राहतील; मिटकरींची आव्हाडांवर टीका

काय घडले नेमके?
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील गावात भारत लांडगे यांच्या शेतात विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर लोंबकळत होती. याचा त्रास दुसऱ्यांना होऊ नये म्हणून राहुल हा तुटलेली वाहिनी ओढून बांधत होता यादरम्यान त्याला शॉक लागला आणि तो बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
राहुल सातपुते याचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. राहुल हा आई वडिलांना एकुलता मुलगा होता. या दोघांचा सुखी संसार सुरु होण्याच्या अगोदर संपल्याने आई वडील व पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे (Solapur Crime) संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!