Eknath Shinde Call

Light : कुणी लाईट देता का लाईट? वर्ध्याच्या पठ्ठ्याचा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन…

561 0

वर्धा : खेडेगाव म्हंटले कि लोडशेडिंग (Light) आले. सरकार बदलत राहिले पण हा प्रश्न काही अजून सुटला नाही. काल रात्री वर्ध्यामध्ये वीज(Light)  गेल्यामुळे संतापलेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कॉलची रेकॉर्डिंग क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Atul Parchure : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंने दिले ‘हे’ दिलखुलास उत्तर

काय आहे नेमके प्रकरण?
सातत्याने वीज (Light) पुरवठा खंडीत होत असल्याने संतापलेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आहे. या तरुणाचे नाव हर्षल ननावरे आहे. तो वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या केळझर गावातील रहिवाशी आहे. त्याने सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने संतापून मुख्यमंत्र्यांना फोन करत वीज पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी यांनी तरुणाच्या मागण्या लक्षात घेत त्याला शांतपणे उत्तरं दिली.

Air Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार: राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता थेट मुख्यमंत्र्यांना फोन केल्याने वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील वीजेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हर्षल याच्यासोबत बोलणं झालेलं नाही, परंतु ओएसडी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा विजेचा प्रश्न सुटू शकतो.

Share This News
error: Content is protected !!