Rohit Sharma

IND vs WI Tour : ‘या’ कारणामुळे चेतेश्वर पुजाराला टीम इंडियातून वगळले, कर्णधार रोहित शर्माचा मोठा खुलासा

737 0

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (IND vs WI Tour) आहे. या दौऱ्यामध्ये (IND vs WI Tour) टीम इंडिया दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आजपासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. संघ निवडकर्त्यांनी या दौऱ्यात अनेक नवीन खेळाडूंना संघामध्ये स्थान दिले आहे. तर या मालिकेतून अनुभवी चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. यावर आता कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे. पुजाराच्या जागी यशस्वी जैस्वालला संघात संधी देण्यात आली आहे. पुजाराच्या ऐवजी जयस्वालला संघात संधी का दिली ? याचा खुलासा रोहित शर्माने सामन्याच्या अगोदर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

काय म्हणाला रोहित शर्मा?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी (IND vs WI Tour) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यशस्वी जैस्वाल वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार असून तो त्याच्यासोबत सलामी करताना दिसणार आहे. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल असे रोहितने सांगितले. याअगोदर तिसऱ्या नंबरवर चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होता.

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

टीम इंडियाला आघाडीच्या फळीतील एका डावखुऱ्या फलंदाजाची दीर्घकाळ गरज होती. जो त्याला यशस्वी जैस्वालच्या रूपाने दिसतो. यशस्वी जैस्वालने फॉर्ममध्ये असलेल्या डावखुऱ्या फलंदाजाच्या रुपाने प्रभावित केले आहे. गिलला स्वतः तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायची होती, असेही तो म्हणाला. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले. तसेच पुजाराचा मागच्या काही सामन्यांमध्ये विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!