Malad Crime News

Malad Crime News : मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग; 12 तासात आरोपीला अटक

972 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी गोरेगावमधील आरे या ठिकाणी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा मालाड (Malad Crime News) या ठिकाणी अशीच घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला रिक्षातून कुठेतरी चालली होती. यावेळी मालाड पश्चिमेतील जैन मंदिरासमोर एका अज्ञात इसमाने रिक्षातच महिलेचा विनयभंग केला. यानंतर पीडित महिलेने मालाड पोलिसात (Malad Crime News) धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार दाखल करून आरोपीला 12 तासाच्या आत अटक केली आहे. मालाड पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Chhagan Bhujbal Threat: कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

काय घडले नेमके?
पीडित महिला 7 जुलै रोजी मालाड (Malad Crime News) पश्चिमेतील आनंद रोडवरुन रिक्षाने प्रवास करत होती. जैन मंदिरसमोर सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने रिक्षात हात घालून महिलेचा विनयभंग केला.भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पीडित महिलेने या प्रकरणी मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला मालाड परिसरातून अटक केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!