मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal Threat) एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून (Chhagan Bhujbal Threat) आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील कार्यालयात हा धमकीचा फोन आला.
Ajit Pawar : बारामतीमधून अजितदादांविरोधात कोणला उमेदवारी? रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर
मी सर्व काम सांगून करतो. उद्या सकाळी छगन भुजबळ यांना मी मारणार, अशी धमकी (Chhagan Bhujbal Threat) या व्यक्तीने दिली. एवढेच नाहीतर त्याने फोनवरून आपलं नाव देखील सांगितलं.या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.