पुणे : राज्यात अपघाताचे (Pune Accident) सत्र सुरूच आहे. पुण्यातील (Pune Accident) नऱ्हे येथे भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा अपघात झाला आहे.मुंबई – बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला आहे. ट्रकचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्यामुळे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडच्या दिशेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Suicide News : ऑनलाइन रमीमध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
ही घटना आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ घडली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक सातारहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन निघाला होता. यादरम्यान हा ट्रक नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ आला असता अचानक ट्रकचा टायर फुटला. यानंतर ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या अपघात झाला.
Pune News : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील घटना
या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील असणारा सर्व कोळसा महामार्गावर पडल्याने काही काळ त्याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जेसीबीने महामार्गावर पडलेला कोळसा हटवण्याचे काम सुरू असून क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव आणि पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आहे.