Pune News

Pune News : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील घटना

734 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विश्वनाथ चौरंग चव्हाण ( वय वर्ष 28) असे शॉक लागून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune News : पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू..! महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

काय घडले नेमके?
विश्वनाथ हा शेती व्यवसायाबरोबरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री (Pune News) कांद्याची गाडी भरण्यासाठी तो सायंकाळच्या सुमारास गेला होता. रात्री काम उरकून माघारी येत असताना रस्त्यावर तुटलेल्या विद्युत तारेचा त्याला शॉक लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Pune News : धक्कादायक! चौथ्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू; पुण्यामधील घटना

काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune News) महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. यामध्ये लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने त्याला शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव होते. त्याच्या माघारी दोन मुले आणि पत्नी असा परिवार होता.

Share This News
error: Content is protected !!