Kolhapur News

Kolhapur News : रस्त्याने जात असताना अचानक गाढवाचा वृद्ध व्यक्तीवर हल्ला; CCTV आले समोर

765 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) गांधीनगरमध्ये एक वेगळी घटना घडली आहे. यामध्ये एका गाढवाने तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. ही घटना काल सकाळच्या सुमारास गांधीनगर वळीवडेकडे जाणाऱ्या परिसरात विक्रम हायस्कूलच्या मैदानात घडली आहे. गाढवाच्या हल्ल्यात लक्ष्मण कुसाळे, गोपीचंद कामरा आणि मयुरी जाधव हे तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर गांधीनगर (Kolhapur News) येथील वसाहत रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच येथे एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तब्बल 13 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. अनेक तक्रारीनंतर या कुत्र्याचा पकडून बंदोबस्त करण्यात आला होता. ह्या कुत्र्याचा बंदोबस्त होतो ना होतो म्हणेपर्यंत आता या गाढवाने परिसरातील तिघांवर हल्ला केला आहे. ही संपूर्ण हल्ल्याची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

वारंवार होत असलेल्या मोकाट जनावरांच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वळीवडे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या मोकाट फिरणाऱ्या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित गाढव मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!