Bus Accident

Bus Accident : ठाण्यात एसटी आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात; 2 जण जखमी

959 0

ठाणे : राज्याचे सध्या अपघाताचे (Bus Accident) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा ठाण्यात एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला. अपघातग्रस्त बसने कंटेनरला मागून धडक दिली. या बसमध्ये एकूण 9 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 2 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वाहक आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

Pune News : खळबळजनक ! 9-10 जणांच्या टोळक्यांचा पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न

कसा घडला अपघात?
अपघातग्रस्त बस ठाणे डेपोमधून बोरवलीकडे निघाली होती. मुंबई -अहमदाबाद हायवेवर विवियाना मॉलच्या समोर या बसनं कंटेनरला मागून धडक दिली. हा अपघात (Bus Accident) इतका भीषण होता की, बसचा समोरचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. फक्त बसचा वाहक आणि एक महिला या अपघातात जखमी झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mehboob Pansare : जेजुरी हादरलं ! जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या

दरम्यान या अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!