Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

888 0

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केले. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात सुपरहिट ठरला होता. यानंतर आता शाहरुखचे (Shah Rukh Khan) ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत.

‘जवान’ आणि ‘डंकी’ने रिलीजआधीच केली 500 कोटींची कमाई
शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या आगामी चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने ‘जवान’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून राजकुमार हिरानीने ‘डंकी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या चित्रपटांनी रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे.

Sharad Pawar: अजित पवारांच्या बंडाचे खरे सूत्रधार शरद पवारचं? ‘ही’ आहेत कारणे

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमाचे सॅटेलाइट, डिजिटल आणि म्यूझिकल राइट्स विकले गेले आहेत. ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमांचे राइट्स वैरिड प्येयरने विकत घेतले आहेत. 450-500 कोटींमध्ये त्यांनी या सिनेमाचे राइट्स घेतले आहेत. ‘जवान’ या सिनेमाचे राइट्स 250 कोटी आणि ‘डंकी’चे राइट्स 230 कोटींमध्ये विकले गेले आहेत. ‘डंकी’ आणि ‘जवान’ या दोन्ही सिनेमांची निर्मिती किंग खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्टच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे.

Saisha Bhoir : साईशा भोईरने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका; ‘ही’ बालकलाकार करणार रिप्लेस

चित्रपट कधी येणार भेटीला?
‘जवान’ या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘डंकी’ हा सिनेमा नाताळ 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!