Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाविकास आघाडी एकत्रच ! पवार, ठाकरे आणि काँग्रेस नेते एकत्र करणार महाराष्ट्र दौरा

658 0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करत, उपमुख्यमंत्री पदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. राष्ट्रवादीतील फुटी बरोबरच आता महाविकास आघाडीमध्येही फूट पडेल असे सांगितले जात होते. पण आता उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. यासंदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्याबाबत महत्वाची चर्चा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नसीम खान यांची उपस्थिती होती.

Raj Thackeray : घडाळ्यानं काटा काढला कि काट्यानं घड्याळ? राज ठाकरेंची टीका

या बैठकीमध्ये (Maharashtra Politics) शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचं ठरवण्यात आले . या दौऱ्याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार आहे. लोकशाहीविरोधी असणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातून उखडून टाकणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : “माझा फोटो परवानगीशिवाय वापरु नये”, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा…

याच पार्श्वभूमीवर (Maharashtra Politics) दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचीही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं सांगण्यात आले. या सर्व लढ्यामध्ये शरद पवार एकटे नसून, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पवार साहेब सुद्धा मजबूत आहेत मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.आता महाविकास आघाडीचं काय होणार? असा प्रश्न राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपस्थित केला जात होता या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना कशी टक्कर देणार , हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!