मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट पडले आहेत.पक्षामध्ये ही उभी फूट पडल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे काही फ्लेक्सची झळकले आहेत. पण त्यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटोही झळकले आहेत. यापार्श्वभूमीवर माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो वापरण्यात येऊ नये, असा इशारा शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे.
Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार
काय म्हणाले शरद पवार?
“माझे फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावेत. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणीही परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नये, अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Ajit Pawar : अजित पवारांच्या एंट्रीमुळे आता पुण्याचा पालकमंत्री बदलणार ?
कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे निलंबित करण्यात यावे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तर शरद पवारांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.