Dhule Accident

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

952 0

धुळे : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Dhule Accident) शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ एक भीषण अपघात झाला. हा अपघात (Dhule Accident) एवढा भयंकर होता कि यामध्ये एका ट्रकने रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडले आहे. हा संपूर्ण अपघाताचा थरार त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Road Accident : धक्कादायक! ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

काय घडले नेमके?
मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं. रस्त्याच्या कडेला थांबलेले प्रवासी, मजूर, शाळकरी विद्यार्थ्यांना देखील चिरडलं आहे. कंटेनरखाली चिरडून मृत पावलेल्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Praful Patel : वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती मात्र… प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

ही संपूर्ण अपघाताची (Dhule Accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. हे CCTV पाहिल्यानंतर तुम्हाला या अपघाताची भीषणता लक्षात येईल. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. पोलिसांनीदेखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.

Share This News
error: Content is protected !!