Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

926 0

मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली.त्यामुळे जयंत पाटील यांनी तात्काळ सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे द्यावीत अशी सूचना प्रफुल पटेल यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांची आमदारांनी गटनेतेपदी निवड केली असून अनिल भाईदास पाटील हे मुख्य प्रतोद असतील असंही प्रफुल पटेल यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कुणावरही अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे करता येऊ शकत नाही विधानसभेच्या अध्यक्षांकडे प्रकरण जातं. त्यानंतर लांबलचक प्रक्रिया पार पडते. असे प्रफुल पटेल म्हणाले.राष्ट्रवादीने अजित पवार आणि त्यांना साथ दिलेला आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? काल अजित पवारांसोबत असलेले अमोल कोल्हे आज म्हणतात…

या पत्रकार परिषदेला स्वतः अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केलं. तुम्ही कुठल्याही नेत्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही किंवा कुठल्याही नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही, आम्ही म्हणजेच पक्ष आहोत असे म्हणत अजित पवार त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इशारा दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!