Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

628 0

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय पातळीवर नेत्यांवर कारवाईसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडलं आहे. त्यामुळे ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळे माझी शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच पक्षविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी.

Share This News
error: Content is protected !!