Ajit pawar Oath

Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते होते ईडीच्या रडारवर; मात्र आता सरकारमध्ये सामील

330 0

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील आदी नेते आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. अजित पवारांच्या या निर्णयामागे प्रफुल पटेल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. अजितदादा यांच्या समवेत सत्तेमध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नेते हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडल्याने, हे घडल्याचं बोललं जात आहे. ज्यात प्रामुख्याने अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे हे ईडीच्या रडारवर होते.

अजित पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक प्रकरण आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणामध्ये, अजित पवार हे ईडी च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.काही दिवसांपूर्वी ईडीनं जरंडेश्वर प्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमधून अजित पवार यांचे नाव वगळले होते.

Sharad Pawar : मी शरद पवार साहेबांसोबतच; रोहित पाटलांनी जाहीर केली भूमिका

हसन मुश्रीफ हे देखील ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.हसन मुश्रीफ हे एका साखर कारखान्याच्या शेअर्सचं प्रकरणामध्ये आणि नातेवाईकाच्या 2100 कोटींच्या कर्ज मंजुरीप्रकरणी ते अडचणीत सापडले आहेत. पण त्यांना मुंबई हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिला आहे.

प्रफुल पटेल हे देखील ईडीच्या रडारवर आहेत. प्रफुल पटेल यांची जमीन हस्तांतरण करून घेतल्या प्रकरणी त्याची ईडी कडून चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थाचा तस्कर इकबाल मिर्चीकडून जमीन हस्तांतरण करुन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

धनंजय मुंडे यांनी बीडमधील 17 एकराचा वादग्रस्त भूखंड अवैधपणे खरेदी केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ईडीनं केस दाखल केलेली आहे.

छगन भुजबळ हे देखील ईडीच्या कचाट्यात आहेत. त्यांच्यावर 2016 पासून ईडीचं प्रकरण प्रलंबित होतं.पण एसीबीकडून छगन भुजबळ आणि त्यांच्या निकटवर्तीयांची नावे वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर भुजबळ यांच्यावर अंधेरीमधील आरटीओ कार्यालयाच्या जागेचे प्लॉटिंगचे अधिकार के. एस. चामनकर यांना देण्यात महत्वाची भूमिका घेतल्याचा आरोप आहे.

अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल पटेल यांच्या विरोधातील ईडीची चौकशी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. धनंजय मुंडे यांच्यासंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीनं अद्याप वेग घेतलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेसमध्ये भूकंप झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!