Praful Patel

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

616 0

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावून, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांचे प्रफुल पटेल (Praful Patel) हे अत्यंत विश्वासू समजले जातात. त्यांच्यावर अनेक वर्षांपासून विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना लगेच राष्ट्रवादीने राज्यसभेवर पाठवले.

Maharashtra Politics : आम्ही शरद पवरांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 5 आमदारांनी जाहीर केली आपली भूमिका

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या डझनभर आमदारांना सोबत घेत, शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादीत मोठे बंड केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर ओबीसी नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदिती तटकरे. अनिल पाटील, धर्मराज आत्राम , हसन मुश्रीफ, संजय बनसोडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

राष्ट्रवादीत बंड झाल्या नंतर शरद पवार यांनी पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीतील बंडाची प्रफुल पटेल यांना माहिती होती असे असताना त्यांनी ते बंड थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यावरून दिल्लीतील सर्व हालचाली प्रफुल पटेल यांनीच केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यासर्व वाटाघाटीच्या बदल्यात प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!