sharad pawar

Sharad Pawar : शरद पवार यांचे बंडखोरांवर थेट कारवाईचे संकेत

624 0

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते गेले असल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठींबा नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. अजित पवारांसह इतर इतर आमदारांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे.भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा चुकीचा आहे . अजित पवारांसह इतर आमदारांनी घेतलेली भूमिका हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ज्यांनी ही पक्षविरोधी भूमिका घेतली त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

अजित पवारांच्या बंडावर काय म्हणले शरद पवार
पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावलं टाकणे , हे पक्षाच्या दृष्टीने योग्य नसून , यावर पक्षाचे प्रमुख लोकं बसतील आणि योग्य निर्णय घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीचे सहकाऱ्यांशी चर्चा करून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर सगळ्यांशी आम्हाला बोलणं करावं लागेल असं शरद पवार यांनी सांगितलं.

पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल’
आताच काही दिवसांपूर्वी पक्षातील काही जणांवर जबाबदारी टाकण्यात आली होती . उदाहरणार्थ कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल , जनरल सेक्रेटरी सुनील तटकरे यांची नियुक्ती केलेली आहे. या सगळ्या प्रकारात त्यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून जी पावलं त्यांनी टाकणे गरजेचे होते. ती त्यांनी टाकलेली नाहीत त्यामुळे पक्ष नेतृत्वाला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही . त्यामुळे मला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!