Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

878 0

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यां आमदारांचा समावेश आहे. राज्यातील या सगळ्या घडामोडीवर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Jitendra Awhad : विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

तेजस्विनी पंडितने काय लिहिले ट्विटमध्ये?
तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) ट्वीट करत म्हटलं आहे की, “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” असं ट्वीट केले. तसेच तिने Maharashtrapolitics असा हॅशटॅग दिला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. या ट्विटला लोकशाही फक्त नावापूरतीच, बाकी सालटं काढायचं काम सुरूच राहील अशी कमेंट केली आहे.

Share This News
error: Content is protected !!