नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूट्यूबच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला बॉडीबिल्डर जो लिंडनर याचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन (Joe Lindner Pass Away) झाले आहे. जो लिंडनरच्या अचानक जाण्याने (Joe Lindner Pass Away) त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यशाच्या उत्तम टप्प्यावर असताना इतक्या कमी वयात लिंडनरचे निधन झाल्याने अनेकजण शॉकमध्ये आहेत. त्याचे एन्युरिझम या आजारामुळे निधन झाले आहे. त्याच्या प्रेयसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही निधनाची बातमी दिली आहे.
Hanuman : ‘आदिपुरुष’नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘हनुमान’; ‘या’ दिवशी होणार रिलीज
काय लिहिले पोस्टमध्ये?
तीन दिवसांपूर्वी तो माझ्या मिठीत होता. त्यानं सांगितलं की माझ्या मानेमध्ये दुखत आहे. पण खूप उशीर झाला होता. त्याने आपल्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी खूप काम केले आहे. तो लोकांना प्रेरणा देत होता म्हणून त्याला वाटले की तो आराम करू शकत नाही किंवा हार मानू शकत नाही. तो खूप गोड, दयाळू, खंबीर आणि कठोर परिश्रम करणारा एकनिष्ठ आणि प्रामाणिक माणूस होता.
लिंडनरने साऊथची अभिनेत्री रश्मिका मानधनाच्या पोगारू चित्रपटातही काम केले होतं. आता त्याच्या जाण्यानं (Joe Lindner Pass Away) त्याच्या चाहत्यांवर आणि कुटुंब मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.