आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्या

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर : वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. मात्र या एकादशी दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतातील विजांच्या ताराचा स्पर्श होवून मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यातील नेबापुरात घडली आहे.

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

काय घडले नेमके?
नंदा मगदूम व अजय मुगदुम अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. आषाढी एकादशी निमित्त राज्यात सगळीकडे चैतन्याचे वातावरण असताना पन्हाळा तालुक्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मगदूम मायलेक आज सकाळी जगताप नावाच्या शेतामध्ये गेले असता रानात अस्थाव्यस्त पडलेल्या वीजांच्या तारांना त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे या मायलेकरांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे हावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोघांचा बळी गेल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.